अल्पवयीन मुलीनेच नवजात बालकाला गटारात टाकले

जिल्हा रुग्णालयात २५ जानेवारीला एका गटारात नवजात अभ्रक मृतावस्थेत आढळून आले होते. अल्पवयीन मुलीने हे जवजात बालक गटारात टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाचा हालगर्जीपणाही अर्भकाच्या दगावण्यास कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या २५ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयाच्या मागच्या गटारात एक नवजात अभ्रक आढळून आले होते या घटनेमुळे अलिबाग परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून तपास सुरू केला. त्यानंतर सायंकाळी एका अल्पवयीन मुलीने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर अल्पवयीन मुलगी ही जिल्हा रुग्णालयात तपासणी साठी आली असता गॅस झाल्याचे कारण तिने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तिला जनरल वार्ड मध्ये दाखल केले. तिच्यावर गॅस झाल्याबाबत उपचार सुरू केले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सदर मुलगी ही रुग्णालायतील स्वच्छता गृहात गेली असता ती त्याठिकाणी प्रसूत झाली. तिने स्वतच प्रसूती करून नवजात झालेले अभ्रक स्वच्छता गृहाच्या खिडकीतून खाली गटारात टाकले. सदरची घटना कोणाच्याच निर्दशनात आली नाही.

सकाळी अल्पवयीन मुलगी ही मला आता बरे वाटत आहे, मला सोडा असे परिचरिकाना सांगू लागली. मात्र त्याचवेळी कोणीतरी अभ्रक गटारात टाकल्याबाबतची ओरड सुरुवात झाली. त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीची पोलिसांनी चौकशी केली असता, आपण कृत्य केल्याचे कबुल केले. मात्र ज्या डॉक्टराने अल्पवयीन मुलीस तपासले त्यावेळी ती गरोदर असल्याचे त्यास समजले कसे नाही, मुलीने रुग्णालयातील परिचारीका आणि कर्मचारयांना हा प्रकार कसा लक्षात आला नाही असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *