कौटुंबीक वादातून आयाज शेख याने पत्नी तबसूम व दिड वर्षीची मुलगी अलीना हिचा पहाटे चार वाजता खून केला. ताडीवाला रोड परिसरात ही घटना घडली.
आरोपी अयाज हा कोंढवामध्ये राहतो. तर त्याची पत्नी तबसूम ही ताडीवाला रोड भागातील बुद्ध विहारजवळ वडिलांकडे राहात होती. आयाज हा पहाटे तिच्या घरात घुसला. त्याने तबसूम आणि मुलीवर चाकूने वार केले. या घटनेत तबसूम आणि मुलगी अलीनाचा मृत्यू झाला. तबसूम ही अयाजला सोडून काही महीन्यांपूर्वी आई-वडिलांकडे आली होती. दोघांमध्ये कौटुंबीक वाद होते. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, अशी माहीती समोर आली आहे.
