कार कालव्यात कोसळली,५ ठार

कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर कारचालक मात्र बचावला आहे. ही दुर्घटना बेळगाव जिल्ह्यातील सौदंत्ती तालुक्यातील कडबी गावाजवळ घडली आहे. मुरगोड पोलीस स्टेशनात या दुर्घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.

एका नातेवाईकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुजेरी कुटुंब सोमवारी गोकाकला गेले होते. गोकाकहून परतत असताना कडबीजवळ अचानक कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. यामुळे त्यांची कार पुलावरून निसटली आणि कालव्यात कोसळली. वेळ असतानाच कार चालकाने कारबाहेर उडी घेतली आणि पोहत पोहत तो किनाऱ्याला आल्यामुळे बचावला. तर फकिरप्पा पुजेरी, हनुमंत पुजेरी,लगमण्ण पुजेरी, पारव्वा पुजेरी आणि लक्ष्मी पुजेरी यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *