भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी सेवकाला अटक

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू  भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा सेवक विनायक दुधाळे याला अटक करण्यात आली आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर विनायक फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

 भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी विनाय दुधाळेला पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावली होती. मात्र तरीही तो पोलिसांच्या समोर हजर झाला नव्हता. अखेर आज त्याला अटक करण्यात आली असून आझाद नगर पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

विनायकला अटक करण्यात आल्याने भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं गुढ उकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या आत्महत्येमागे अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत होते. त्यामुळे स्वत: आयपीएस अधिकारी अगम जैन यांनी ही केस हातात घेऊन तपासाला सुरुवात केली होती. भय्यू महाराज यांनी १२ जून रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी लिहिलेली कथित सुसाईड नोट मिळाली होती. त्यात तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *