राज्याबाहेरून आणलेल्या गांजा विक्री प्रकरणी ताज मोहम्मद इसाक मोहम्मद (वय 62, रा. फिरोजपूर, छपरा, बिहार) औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ताज मोहम्मदकडून पोलिसांनी 28 किलो 980 ग्रॅम वजन असलेला गांजा जप्त केला. या गांजाची बाजारातली किंमत तीन लाखांच्या घरात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील फुलेनगरात राहणारा ताज मोहम्मद हा गांजाच्या पुड्यांची विक्री करत असल्याची माहिती उपनिरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली होती. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे, जमादार वसंत शेळके, प्रकाश गायकवाड, फकीरचंद फडे, सुधीर सोनवणे, देवीदास इंदोरे, एम.पी.कौलमी, राजकुमार सुर्यवंशी, बंडु गोरे, बाळासाहेब आंधळे, प्रदीप कुंटे, संजय हंबीर, महिला पोलिस शिपाई राखी थोरात आदींच्या पथकाने ताज मोहम्मदच्या घरावर मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास छापा मारला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरातून २ लाख ९८ हजार ८०० रूपये विंâमतीचा २८ किलो ९८० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
