येवला – मनमाड कार अपघातात १ ठार ७ जखमी

कार आणि ओमनी कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एक ठार आणि सात जखमी झालेत. येवला मनमाड महामार्गावर सावरगाव शिवारात असलेल्या काटे वस्तीजवळ हा अपघात झालाय.

मध्य प्रदेशमधून आलेली एर्टिका कार मनमाडहून शिर्डीकडे जात होती. तर ओमनी व्हॅन येवल्याहून मनमाडकडे जात होती. त्यावेळी या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी येवल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर गंभीर जखमींना नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *