संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भीम आर्मीचा गोंधळ

श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या मुंबईतील कार्यक्रमात दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शिवडी परिसरात रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी करून कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये अनेक महिला कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकारानंतर संभाजी भिडे येथून निघून गेले.

आज (रविवार) सांयकाळी संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होता. दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला काही कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी केली. त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा असाच प्रकार घडला.  अखेर धारकरी आणि पोलिसांच्या सुरक्षेत भिडे कार्यक्रम स्थळावरून निघून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *