वारकरी वाटावेत म्हणून चक्क टोप्या वाटल्या

मुख्यमंत्र्याना खुश करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. म्हणूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यक्रमाला वारकरी उपस्थित होते हे दाखवण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांनी वेगळीच शक्कल लढवली. पण त्यांचं बिंग फुटलंच.

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपस्थितांना चक्क गांधी टोप्यांचं वाटप करण्यात आलं. आपल्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या भोसले यांनी थेट कराडवरुन मर्जीतल्या पत्रकारांची आणि कार्यकर्त्यांची फौज आणली आहे. मात्र, कार्यक्रमापूर्वीच टोप्यांचे वाटप सुरू झाल्याने याची विचारणा करताच सगळे वारकरी दिसावेत, असं उत्तर देत कार्यकर्त्यानं अतुल भोसले यांचे बिंग फोडलं.

दरम्यान, पोलीसांच्या अतिरेकाचा वारकरी संतानाही फटका बसला. प्रत्येक वारकऱ्याला रुमाल उघडून दाखवायला लागला. यामुळे पोलीस सुरक्षेचा अतिरेक करीत असल्याने वारकरीही हैराण झाले आणि नाराज झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *