आं​ध्र प्रदेशला फेथाई वादळाचा तडाखा,१ ठार

बंगालच्या उपसागरातील हालाचालींमुळे तयार झालेल्या फेथाई वादळाचा तडाखा आज सकाळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यात बसला आहे. या वादळामुळे विजयवाड्यात दरड कोसळली असून आतापर्यंत एका इस.माचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
दक्षिण बंगाल आणि सीमांध्राला फेथाई वादळाचा तडाखा बसू शकतो अशी शक्यता रविवारी हवामान खात्याने वर्तवली होती. पण रविवारी संध्याकाळी मात्र आकाश निरभ्र होते. रविवारी सकाळी विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर जोरदार पावसास सुरुवात झाली. आंध्र इतर ठिकाणीही पावसाची संततधार सुरू झाली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सकाळीच परिस्थितीचा आढावा घेतला असून राज्यात हायअॅलर्ट जाहीर केला आहे. आंध्रप्रदेशाती १३ पॅसेंजर ट्रेन्सही आज रद्द करण्यात आल्या आहेत. विजयवाडाजवळ वादळामुळे दरड कोसळून एका २३ वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. काकीनाडाच्या किनाऱ्यावरही समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. दुपारपर्यंत या वादळाचा जोर वाढत जाणार असून संध्याकाळी तो ओसरेल असं भाकीत हवामान खात्याने वर्तवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *