मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन इंडिगो सुरक्षेला आला आहे. मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान बॉम्बने उडवू अशी धमकी इंडिगो कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेला आली. या संदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. ज्यानंतर हे विमान रिकामे करण्यात आले आणि त्याची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही मिळाले नाही. यासंबंधी माहिती देणाऱ्या महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे असेही समजते आहे. तिने असा दावा केला आहे की विमानात बॉम्ब ठेवणाऱ्या काही लोकांना ती ओळखते. ही महिला मूळची सिंगापूरची असून पुढील चौकशी सुरु आहे समजते आहे.
