सुला वाईन एका नव्या विक्रमासाठी सज्ज

जगभरात वाईनची सर्वाधिक विक्री करणारी सुला वाईन आता एका नव्या विक्रमासाठी सज्ज झाली आहे. नाशिकची सुला वाईन म्हणजे मद्यप्रेमींचं आवडतं ठिकाण. दहा लाख वाईन केसची विक्री करत सुला वाईन जगामध्ये सर्वाधिक वाईन विक्री करणारी कंपनी ठरली आहे. आता सुला वाईनमध्ये यंदा 13 हजार टन द्राक्षावंर प्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वीस टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांसाठी वातावरणही उत्तम आहे.

यासाठी 400 एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड करण्यात येणार आहे. वाईनसाठी द्राक्षांची लागवड वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. द्राक्षांच्या या मोठ्या प्रमाणावरच्या लागवडीसह नवा विक्रम करण्यासाठी सुला वाईन्स सज्ज झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *