काही भागांत उद्या पाणी बंद

स्टेम वॉटर डिस्ट्री अँण्ड इन्फ्रा कंपनी यांनी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठ्याचेही पाणी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर व कळव्याच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *