मुंबईत आलेल्या भुज एक्सप्रेसमध्ये महिलेची हत्या

सुरतहून मुंबईला आलेल्या भुज एक्स्प्रेसच्या महिला डब्यात एका ४० वर्षीय महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भुज-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडलीये. गाडी दादर स्थानकात पोहोचल्यानंतर ही हत्या झाल्याचं उघड झालं. पोलीसांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केलाय.

धारधार शस्त्रानं हत्या 

आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही मुळची सुरतची रहिवासी असून ती वडाळ्यात आपल्या बहिणीकडे आली होती.

धारधार शस्त्रानं तिची हत्या करण्यात आलीये.

ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध अद्याप लागला नाही.

पोलीस यंत्रण मृत महिलेच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहे.

सीसीटीव्ही तपासणार 

सुरतहून निघालेली ही गाडी गुजरात महाराष्ट्र सीमेवरील वसई स्थानकात थांबते. त्यामुळे आता सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा पत्ता लावणे सोपे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *