चार गुरुत्वीय लहरींची लायगो, व्हर्गो प्रकल्पात नोंद

अमेरिका आणि युरोपमधील वैज्ञानिक यंत्रणांना यश

लायगो या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत आणखी चार गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात आले असून, कृष्णविवरांच्या एकमेकांवरील आघातानंतरच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होत असते.

अमेरिकेतील लायगो व युरोपच्या व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी १० कृष्णविवरांच्या व एका न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली आहे. यात गुरुत्वीय लहरी घटनांची नोंद GW170729, GW170809, GW170818, and GW170823 या नावांनी झाली असून, त्यातील जीडब्ल्यू १७०७२९ या गुरुत्वीय लहरी २९ जुलै २०१७ रोजी नोंदल्या गेल्या. त्या जास्त वस्तुमान असलेल्या दूरस्थ स्रोतापासून आलेल्या होत्या. त्यातील विलीनीकरणाची घटना ही पाच अब्ज वर्षांपूर्वीची असून, त्यात निर्माण झालेली ऊर्जा ही पाच सौर वस्तुमानाइतकी आहे. तिचे रूपांतर शेवटी गुरुत्वीय लहरीत झाले. १२ सप्टेंबर २०१५ ते १९ जानेवारी २०१६ या काळात पहिल्यांदा गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला लायगो प्रकल्पात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रगत लायगो प्रकल्पात तीन द्वैती कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या. ३० नोव्हेंबर २०१६ ते २५ ऑगस्ट २०१७ या काळात एका द्वैती न्यूट्रॉन ताऱ्याच्या विलीनीकरणातून व सात कृष्णविवरांच्या विलीनीकरण घटनातील गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या. जीडब्ल्यू १७०८१४ ही नोंद पहिल्या द्वैती कृष्णविवर मिलनातील असून ती तीन यंत्रांनी घेतली होती. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या लहरींची नोंद जीडब्ल्यू १७०८१४ या लहरींच्या नोंदीनंतर झाली होती. यातील बहुतेक आघाती मिलन हे गुरुत्वीय लहरी व प्रकाश निर्माण करणारी होती. जीडब्ल्यू १७०८१८ या गुरुत्वीय लहरी लिगो व व्हिर्गो वेधशाळांनी अधिक अचूकतेने नोंदल्या होत्या. त्यात द्वैती कृष्णविवरे ही अडीच अब्ज प्रकाशवर्षे दूर एकमेकांवर आदळली. त्यातून या गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्या. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरीही जास्त अचूकतेने नोंदल्या गेल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *