घरात मुलीच्या जन्मानंतर तिच्या बारशाच्या कार्यक्रमास पित्याने मोठ्या हौशेने डीजे लावला होता. सर्वजण आनंदाने डीजेच्या तालावर नाचत होते. त्याचवेळी नात्यातील दोन मुले या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी डीजेला त्यांच्या आवडीचे गाणे लावण्याची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या डीजे मालकाने दोन्ही मुलांवर गोळ्या झाडली. दोघांच्याही पोटात गोळी लागली. यामुळे एका मुलीची किडनी काढावी लागली तर दुसऱ्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम गावात रविवारी रात्री घडली.
या प्रकरणातील तक्रारदार आणि संशयित आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन्ही कुटुंबात नातेवाईकांमुळे भांडण झाले. एका पाहुणा डीजेचं काम करतो. गोळी झाडल्याप्रकरणी आशू आणि अमित यांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी सांगितले. त्यांचा भाऊ संजयचा शोध घेतला जात आहे. जखमींमध्ये २५ वर्षीय शेंकी आणि १६ वर्षीय तुषारचा समावेश आहे.
शेंकीचे वडील राजेंद्र यांनी सांगितले की, तुषार त्यांचा लहान भाऊ बिजेंद्र यांचा मुलगा आहे. ज्या घरात कार्यक्रम होता. ते नरेशचे घर असून नरेश हे त्यांचे काका आहेत. शेंकी आणि तुषार रात्री कार्यक्रमात सहभागी झाले. गाणे लावण्यावरुन डीजेबरोबर त्यांचा वाद झाला. हे प्रकरण नंतर वाढले. डीजे वाजवणााऱ्याने आपल्या मालकाला बोलावले. त्यानंतर मालकाने आपल्या दोन भावांना बोलावले. प्रकरण इतके टोकाला गेले की, डीजे मालकाने तीन राऊंड गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या शेंकी आणि तुषारला लागल्या. दोघांच्या पोटात गोळी लागली. तिसरी गोळी भिंतीला लागली.
जखमी अवस्थेत या दोघांना सेक्टर १८ द्वारका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुषारची एक किडनी काढण्यात आली असून शेंकी सोमवारी सकाळी १० वाजता शुद्धीवर आला. त्याच्या पोटातून अद्याप गोळी काढण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
