फोन बॅकअपमुळे फुटले मुंबईतील नराधम पित्याचे बिंग, तुरुंगात रवानगी

मुंबईतील डी एन नगर पोलिसांनी १३ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम पित्याला अटक केली आहे. फोन बॅकअप मुळे हा प्रकार समोर आला असून पतीचे कृत्य कळताच मुलीच्या सावत्र आईने या घटनेची माहिती नातेवाईकाला दिली आणि शेवटी नराधम पित्याची रवानगी तुरुंगात झाली.

डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३६ वर्षांचा तरुण, पत्नी आणि १३ वर्षांच्या मुलीसह राहत होता. आरोपी तरुण हा आरटीओत एजंट असून त्याचे हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून १३ वर्षांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीची पत्नी त्याच्या फोनचा बॅकअप घेत होती. यादरम्यान तिला सावत्र मुलीचा अश्लील फोटो दिसला. तिने पतीला याचा जाब विचारला असता त्याने उत्तर देण्यास नकार दिला. शेवटी तिने मुलीला विश्वासात घेत तिच्याकडे विचारपूस केली आणि मग नराधम पित्याच्या आत्यचाराला वाचा फुटली. पत्नीने मुलीच्या काकाला हा प्रकार सांगितला आणि त्यानेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

आरोपी हा गेल्या दीड वर्षापासून स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. घरी कोणीही नसताना तो मुलीला कपडे काढायला लावायचा आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली असून या घटनेनंतर त्याची दुसरी पत्नी उत्तर प्रदेशला माहेरी परतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *