स्कूलबसची काच फुटल्याने रस्त्यावर पडून 4 विद्यार्थी जखमी

चालत्या स्कूलबसची पाठीमागची काच फुटल्यानं रस्त्यावर पडून चार मुलं जखमी झाली आहेत. नगरनाका ते लोखंडी पूल या दरम्यानच्या छावणी पुलावर हा अपघात झाला. शांताबाई प्राथमिक विद्यालयाच्या या बसमधून विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी नेण्यात आलं होतं. तिथून परतताना हा अपघात झाला. या बसमध्ये शंभर मुलं होती. जखमी मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *