आसाममध्ये इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये स्फोट, ११ जण जखमी

आसामच्या उदालगुरी जिल्ह्यात शनिवारी रात्री इंटरसिटी एक्सप्रेसच्या एका डब्ब्यात स्फोट झाला. यामध्ये ११ जण जखमी झाल्याची माहिती आहे. हरीसिंगा रेल्वे स्टेशनजवळ कामाख्या-देकरगाव इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये ७ वाजून ४ मिनिटांनी हा स्फोट झाला.

राजधानी गुवहाटीपासून ९५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटकांमुळे की इलेक्ट्रीकल शॉर्ट सर्कीटमुळे हा स्फोट झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी ११ प्रवाशांमध्ये एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त  दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *