भिवंडीत प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

भिवंडीतील एका कारखान्यातील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

राहनाल गावच्या हद्दीत असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाला आज सकाळच्या सुमारास आग लागली. गोदामात केमिकलचा साठा असल्याने ही आग आणखी भडकली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच्या बाजुला रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आग अद्याप आटोक्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *