वहिनीचा खून करुन बलात्कार, चिमुकल्या पुतणीचीही हत्या

वहिनी आणि ४ वर्षांच्या पुतणीचा खून करून वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक आणि विकृत घटना नागपुरात घडलीय. चंद्रशेखर भिंद असं नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केलीय.

मृत महिलेचा पती ट्रक ड्रायव्हर आहे. मृत महिलेचा पती २६ नोव्हेंबरला ट्रक घेऊन गेला होता. त्यावेळी चंद्रशेखर भावाच्या घरी आला आणि त्याने वहिनीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यामुळे संतापलेल्या चंद्रशेखरने तिचा गळा आवळून खून केला. आणि चार वर्षीय पुतणीचीही हत्या केली. त्यानंतर नराधमाने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला.

वडधामना येथे बुधवारी रात्री एक महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत घरीच आढळून आला. याप्रकरणी पोलिसांना सुरुवातीपासून हत्येचा संशय असल्याने त्यांनी लगेच त्यादिशेने तपास सुरु केला. मृत महिलेचा पती ट्रकचालक आहेत. तो २६ तारखेलाचा जालन्याकडे रवाना झाला होता. त्यामुळे आई आणि मुलगी घरीच एकटी होती. बुधवारी दुपारी दिर चंद्रशेखर वहिनीकडे आला. त्याने वहिनीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. वहिनीने विरोध करताच चंद्रशेखरने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुतणीचीही हत्या केली. धक्कादायक म्हणजे या नराधम दिरानं हत्या केल्यानंतर अगोदर वहिनीच्या  मृतदेहावर अत्याचार केला. नंतर पुतणीशीही अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात दोघींचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयाच्या आधारे चंद्रशेखरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघींची हत्या करून अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *