मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) च्या महिला कर्मचाऱ्याने व्हील चेअरवरून जबरदस्तीने उठवल्याचा आरोप दिव्यांग तरुणीने केला आहे. विराली मोदी (२७) या तरुणीने याबाबत व्टिट करुन तक्रार मांडली आहे.
विराली जेट एअरवेजच्या विमानाने सोमवारी मुंबईहून लंडनला निघाली होती. विमानतळावर तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या महिला कर्मचाºयाने विरालीची व्हिल चेअर स्कॅन केली. तिने तिला उभे राहण्यास सांगितले. पायाने अधू असल्याने उभे राहणे अशक्य असल्याचे विरालीने तिला सांगितले. तरी देखील महिलेने तिला उचलले व उभे केले. असे तिने तिनदा केले. यामुळे वेदना झाल्या व पायला सूज आली, असे तीने व्टिट केले आहे.
नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी तरुणीबरोबर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तर विराली यांचा अपमान केला नसून नियमित चेकिंगचा एक भाग असल्याचे सीआयएसएफने स्पष्टीकरण दिले आहे.
