ईशा अंबानीचा प्री वेडिंग Look

मुंबईतील सर्वात सुंदर आणि महागड्या एंटालिया घरात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नाची लगबग सुरू झाली. 12 डिसेंबरला आनंद पीरामलसोबत ईशा सात फेरे घेणार आहे. ईशाच्या लग्नाच्या सुरूवातीच्या विधी सुरू झाल्या आहेत. यातच तिचा प्री वेडिंगचा लूक समोर आला आहे.

अंबानी यांनी मुलीच्या लग्नाअगोदर घरात शांती पूजा ठेवली असून घरात लगीनघाई जोरात सुरू आहे. ईशाने या पूजेकरता सब्यसाची मुखर्जीचा डिझाइनर लूक कॅरी केला आहे.

सब्यसाचीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पहिल्या विधीसाठी तयार झाली आहे. सब्यसाचीच्या या लूकमध्ये ईशा रॉयल प्रिंसेस दिसत आहे. ईशाचा लेहंगा जितका सुंदर आहे तितकीच तिची ज्वेलरी देखील सुंदर आहे.

सब्यसाचीच्या तयार केलेल्या लेहंग्यात हँड एंब्रोडरी तिल्ला वर्क केलं आहे. तिचा हा लूक अतिशय सुंदर दिसत आहे. नववधुचा ग्लो ईशाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

सोमवारी मुकेश अंबानी आपल्या मुलासह अनंतसोबत आंध्रप्रदेशच्या तिरूपती मंदिरात गेले होते. तिथे त्यांना लग्नाचं कार्ड व्यंकटेश देवासमोर ठेवले. या अगोदर मुंबईत सिद्धिविनायका चरणी हे कार्ड ठेवलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *