वांद्र्यातील शास्त्रीनगर परिसरात भीषण आग

वांद्रे येथील शास्त्रीनगर झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी (27 नोव्हेंबर) आग  लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

वांद्रे पश्चिम येथील जामा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या शास्त्री नगर परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल 2 ची आग म्हणून घोषित केले आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात भीषण आग लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *