वडाळा येथे पेट्रोल टँकरला भीषण आग, चालकाचा मृत्यू

वडाळा परिसरातील भक्ती पार्क येथे सोमवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पेट्रोलच्या टँकरने पेट घेतला. मोनोरेलच्या मार्गानजीकच ही दुर्घटना घडल्याचं कळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मृत व्यक्ती ही टँकरचा चालक असल्याचं कळत आहे. आगीमध्ये टेम्पोला धडकून टँकर उलटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी लगेचच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली.

अग्निशमन दलातील अधिकारी ए.एच. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव दल तेथे दाखल झाले त्यावेळी तेथे टँकर उलटलेला दिसला असून, त्यात मिथेनॉल असल्यामुळे त्या टँकरने पेट घेतल्याचं वृत्त समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *