नवरोबांचा प्रताप, पॉर्न साईटवर बायकोचे फोटो आणि मोबाईल नंबर

नवरा बायकोचं भांडण कोणत्या कुटुंबाला चुकलं नाही असं म्हणतात. पण काही महाभाग किरकोळ भांडणही टोकापर्यंत नेतात. असाच काहीसा भयानक प्रकार समोर आलायं. बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग म्हणून तिचे फोटो आणि मोबाईल नंबर पॉर्न साईट्सवर टाकण्याचा प्रताप या ‘महाभागा’ने केलायं. यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन्स येऊ लागले. तिने या संदर्भात जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी शोध सुरु केला.

पॉर्न साइटवर तिचे फोटो आणि मोबाईल नंबर टाकणारा तिचा पतीचं असल्याचे तपासात समोर आलंय. रविवारी नोएडातील सेक्टर 27 मधून या पतीला ताब्यात घेण्यात आलंय.

हे पती पत्नी मुळचे ओडिसाचे राहणारे असून पती सेक्टर 3 मधील एका कंपनीत असोसिएट कंसल्टंट पदावर तर पत्नी बीपीओमध्ये कार्यरत आहे. 2011 साली दोघांच लव्ह मॅरेज झालं. दहा महिन्यापूर्वी कोणत्या तरी  कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि मुलीला पत्नीने स्वत:कडे ठेवून घेतलं.

तुरूंगात रवानगी 

वेगळं रहायला लागल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून तिच्या हालचालींकडे लक्ष ठेवायचो असे पतीने सांगितलं. आपल्याशी विभक्त होऊनही पत्नी खुश आहे आणि ऑफिसमधून बाहेर आऊटींगलाही जातेय तेव्हा त्याला संताप अनावर झाला.

तिला धडा शिकविण्यासाठी त्याने तिचा मोबाईल नंबर आणि फोटो पॉर्न साईट्सवर टाकले.

पतीला अटक केल्यानंतर न्यायालयात नेण्यात आलं. इथून त्याला तुरूंगात पाठवण्यात आलंय.

पॉर्न साईट्सवर बंदी 

काही दिवसांपुर्वीच बहुचर्चित पॉर्न साइटवर बंदी आणल्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आपल्या संस्कृतीवर घाला आहे, मुलांवर वाईट परिणाम होत आहेत असं या निर्णयाचं समर्थन करणाऱ्यांच मत आहे.

तर यातून लैंगिक शिक्षण मिळत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

बंदीच्या निर्णयानंतरही अनेक साईट्स सुरू असल्याने निर्णयाचे स्वागत करणाऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून येतोयं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *