आजोबाने बलात्कार केल्याने अल्पवयीन नात गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. पण त्या बाळाबद्दल लोकांना कळले तर लोक काय म्हणतील या भितीपोटी तिने त्या नवजात बाळाची ब्लेडने गळा कापून हत्या केली. फलटण तालुक्यातील बागेवाडी बरड येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अजोबा विरोधात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तिने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. हे मूल तिला नको होते. लोकांना कळले तर तिची व आजोबाची बदमानी होईल म्हणून तिने बाळाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून खून केला. बाळाचा मृतदेह ऊसाचे शेतात पुरला. या प्रकरणी सूर्यदास निगडे रा.बागेवाडी बरड यांनी अल्पवयीन मुलीविरोधात तक्रार दाखल केली. आजोबा शामराव बाजीराव जाधवविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
