खार स्टेशनला लोकलच्या पेंटाग्राफला आग, प्रवाशी सुरक्षित

मुंबईत खार स्टेशनला लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली, आगीनंतर सर्व प्रवाशी सुरक्षित खाली उतरली. ऐन गर्दीच्या काळात ही घटना घडल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक लोकल खोळंबल्या आहेत, यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर प्रवासी खोळंबल्याने गर्दी दिसून येत आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत.

यावेळी खार स्टेशनला उभ्या असलेल्या लोकलच्यावर पेंटाग्राफला आग लागल्याने घबराट पसरली होती. तर गाड्या का खोळंबल्या आहेत, यामुळे प्रवाशी देखील चिंतेत दिसून आले. वाहतूक लवकरच पूर्ववत होणार असल्याचं रेल्वे प्रशासानाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *