चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेखाली येऊन वाघाचे दोन बछडे ठार

जुनोना जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाचे   दोन बछडे ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. चांदा फोर्टकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीखाली ही घटना घडली. ही गाडी सकाळी चंद्रपूरहून सहा वाजता निघते. ती जुनोना या परिसरातील घनदाट जंगलातून जाते. पहाटेच्या वेळेस रेल्वे रुळावर आलेल्या या बछड्यांचा या गाडीखाली येऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जातो आहे. हा अपघात एफडीसएमच्या वनपरिक्षेत्रातील आहे. याआधी बिबट, अस्वलाची पिल्ले रेल्वेखाली ठार झाली आहेत. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *