फिरायला आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अनिल थेटे आणि बाबा भगत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

वर्धा – जबलपूर महामार्गावर शुक्रवारी रात्री १९ वर्षांची तरुणी तिच्या मित्राबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी अनिल आणि बाबा हे दोघे त्यांच्याजवळ आले. या दोघांनी तरुणीच्या मित्राला दमदाटी आणि मारहाण करुन पळवून लावलं. आणि तरुणीला बाजूच्या झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *