अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाचा गुन्हा घेतला मागे

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं. २०१४ मधील विनयभंगाचा गु्न्हा मागे घेण्यासाठी नेस वाडियानं याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी नेस वाडिया आणि प्रतिची ऑन कॅमेरा सुनावणी झाली. आणि नेसवरील गुन्हा रद्द कऱण्यात आला.

नेस वाडीयानं माफी मागितल्यास गुन्हा मागे घेण्यास प्रिती तयार होती. मात्र माफी मागण्यास नेस वाडीयानं गेल्या सुनावणीत नकार दिला होता. केवळ माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठीच प्रितीनं हा आरोप केल्याचा दावा केला नेस वाडियानं केला होता. दोघांच्या युक्तीवादानंतर खंडपीठानं यावर सामोपचारानं तोडगा काढण्याचा सल्ला न्यायालयानं दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *