महिला पोलिसाला रिक्षा चालकानं फरफटत नेलं

रिक्षा चालकाची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. परवाना मागणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षा चालकानं फरफटत नेलं. सीसीटीव्हीमध्ये मारहाणीची ही दृष्य कैद झाली आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली आहे.

कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणा-या आशा गावंड या कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचं काम पाहत होत्या. त्यावेळी त्यांनी नागेश अवालगिरी या रिक्षा चालकाकडे लायसन्स मागितलं मात्र घाबरुन त्यानं भरधाव वेगानं रिक्षा पुढे नेली. गावंड यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं रिक्षा भरधाव वेगानं पुढं नेलेल्या रिक्षासोबत गावंड काही अंतरावर फरफटत गेल्या.

नागरिकांनी आरडाओरड करत नागेशला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेत गावंड जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी नागेशला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *