पूनम पांडेने ज्येष्ठ अभिनेत्यावर केलायं छेडछाडीचा आरोप

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर #MeToo प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनलंय. तनुश्री दत्ताने स्वत:वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर आता अनेक महिला समोर आल्या आहेत. नुकतेच बोल्ड अभिनेत्री पुनम पांडेनेही  #MeToo अंतर्गत आरोप केले आहेत. एका ज्येष्ठ अभिनेत्याचे नाव न घेता छेडछाड केल्याचा आरोप तिने केलायं. ‘’द जर्नी ऑफ कर्मा’या सिनेमाच्या शुटींगमधील बेडरुम सीन दरम्यान त्यांच्या वागण्याने मला त्रास होत होता’, असं तिने सांगितलं.

त्यावेळी विचित्र अनुभव आल्याचेही तिने सांगितले. मला त्यांच नाव घ्यायचं नाही पण मी फक्त एवढंच सांगेन की त्यांची मुलगी माझ्या वयाची आहे.

‘द जर्नी ऑफ कर्मा’ सिनेमात पूनम पांडेसोबत शक्ती कपूरने काम केलंय. यामध्ये दोघांनी बेड सीन  पण पूनमने कोणाचं नाव न घेता हे आरोप केल्याने तुर्तास तरी शक्ती कपूरला दिलासा आहे.

सलमानवरही आरोप 

आता या सगळ्यात अभिनेता सलमान खान याच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. मॉडेल पूजा मिश्रा हिने सलमान खानने आपला मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच सलमानचे बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीशी लैंगिक संबंध असल्याचा गौप्यस्फोटही पूजाने केला आहे. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत नव्याने खळबळ उडाली आहे.

तनुश्रीची तक्रार 

अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनला आली होती. हा जबाब नोंदवण्यासाठी तनुश्री दत्ता बुरखा घालून आली होती. तनुश्रीचं बुरखा घालून पोलीस स्टेशनला यायचं कारण अजून समोर आलेलं नाही.

२००८ साली छेडछाड झाल्याचा आरोप करत तनुश्री दत्तानं काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *