पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या मांजाने गळा कापल्याने डॉक्टर तरुणीचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टर तरुणीचा पतंगाच्या मांजाने गळा कापला गेल्याने जखमी होऊन मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी आठच्या सुमारास नाशिकफाटा येथील पुलावर घडली आहे. ऋषाली निकम अस मयत झालेल्या डॉक्टर तरुणीच नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, मयत ऋषाली निकम वय-२५ रा.गोविंद गार्डन पिंपळे सौदागर या पुण्याहून भोसरी च्या दिशेने दुचाकीवरून जात होत्या.तेव्हा धावत्या दुचाकीवरील ऋषाली यांच्या गळ्याला पतंगाच्या मांजाने कापले आणि त्या खाली पडल्या.या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऋषाली या डॉक्टर असल्याची माहिती समोर येत आहे.

 परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा पतंगाचा मांजा किती घातक आहे याची प्रचिती येते.गेल्या काही महिन्यांपूर्वी काळेवाडी येथे देखील दुचाकीवरून जाताना चिमुकल्याचा गळा पतंगाच्या मांजाने कापला होता.यात तो गंभीर जखमी झाला होता.घटनेनंतर पतंगाच्या मांजावर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित मुलाच्या वडिलांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *