ज्येष्ठ नागरिकांना लवकरच मिळणार ‘बेस्ट’ सवलत

ज्येष्ठ नागरिकांना बेस्टच्या बस भाड्यामध्ये यापुढे ५० टक्के सूट देण्याचे प्रशासकीय स्तरावरील काम पूर्ण झाले असून, लवकरच अंमलबजावणीस सुरुवात होणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना विश्वनाथ महाडेश्वर बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने त्यांचा सन्मान हा सातत्याने होण्यासोबतच तो प्रत्येक मुंबईकरांच्या कृतीतूनही दिसला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *