पतीने अनैतिक संबधाला विरोध केल्याने पत्नीने संतापाच्या भरात आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता या चिमुकलीचा मृतदेह गवतात फेकून दिल्याची घटना डोंबिवलीनजीकच्या भोपर गावात घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस स्थानकात आई पूजा प्रसाद हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा मूळचे उत्तरप्रदेशचे असणारे ननकण प्रसाद व पूजा प्रसाद हे दाम्पत्य डोंबिवली पूर्वेकडील भोपर येथील विठाबाई चाळीत राहत होते. त्यांना एक वर्षाची आरती नावाची मुलगी होती. पूजा हिचे अनैतिक सबंध असल्याची कुणकुण ननकण याला लागली होती. त्यातून या दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. ननकण अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने पूजा संतापली होती. बुधवारी पुन्हा या पती-पत्नीमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात पूजाने बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर तिचा मृतदेह चाळीच्या बाजूला वाढलेल्या गवतात फेकून दिला. आपली मुलगी कुठे दिसत नसल्याने नानकन याने तिचा सर्वत्र शोध घेतला असता पूजाने तिची हत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.
