पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न सोने व्यापाऱ्याला लुटले

मुंढवा येथील एका सराफा व्यापाऱ्यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापाऱ्याने विरोध केला असता दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास मुंढवा येथील हरिकृष्ण ज्वेलर्स येथे घडली.

लुटण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव मिलन सोनी (35, रा. मुंढवा) असे आहे. दरोडेखोरांच्या हल्यात तेजखमी झालेत. मिलन सोनी यांचे केशवनगर मुंढवा येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास चार ते पाच जण तोंडाला रुमाल बांधून शिरले व कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील ऐवज लुटण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोनी यांनी हल्लेखोरांचा विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्या अंगावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सोनी यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर तेथून पसार झाले.

घडलेल्या प्रकारची माहिती कळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले.हल्ल्यात जखमी झालेल्या सोनी यांना खाजगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यावरून आरोपींना शोधण्याचे काम मुंढवा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *