आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी

महाबळेश्वरला कोकणातील पोलादपूरशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज सकाळी दरड कोसळली असल्याची माहिती मिळते आहे. ही दरड कोसळल्यामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली असून अनेक प्रवासी घाटात अडकले आहेत.

आज सकाळी आठच्या सुमारास आंबेनळी घाटात मोठी  दरड कोसळली. दरड कोसळल्यावर प्रशासकीय यंत्रणेने लगेच रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. आजुबाजूच्या गावातील चाकरमाने मोठ्या प्रमाणात या घाटाचा येण्याजाण्यासाठी वापर करतात. दरड कोसळल्यामुळे ते घाटात अडकले असून त्यांची गैरसोय झाली आहे. तर महाबळेश्वरला जाणारे पर्यटकही घाटात अडकले आहेत. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असून लवकरच रस्ता मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *