मालगाडीतील महिला गार्डचा विनयभंग

कल्याण पूर्वेकडील रेल्वे यार्डात मालगाडीवर कर्तव्यावर असणाऱ्या महिला गार्डचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आल्याने महिलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण आणि कसारा रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या मालगाडीवर एका महिला गार्डची ड्युटी होती. ही मालगाडी कल्याण रेल्वे यार्डात पोहोचली असता सिग्नल लागल्याने एका ठिकाणी गाडी धीमी झाली. याचा फायदा घेत चालत्या मालगाडीत दोन अनोळखी व्यक्ती महिला गार्डच्या केबिनमध्ये घुसल्या. त्यांनी महिला गार्डसोबत गैरवर्तन केले. तिने आरडा ओरडा करत प्रतिकार केल्याने दोघा विकृतांनी पलायन केले. या प्रकरणी महिला गार्डने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तक्रार नोंद करून हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *