आठ तोळे दागिने घरफोडीत चोरीला

नगर शहरात बंद घरे फोडून रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने चोऱ्या सुरूच आहे. सावेडी उपनगरातील मिस्कीन मळ्याजवळील मेघराज अपार्टमेंटमधील बंद प्लॅटचा दरवाजा तोडून २ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दोन हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवनाथ शंकर वेताळ यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी नऊ ते सांयकाळी चारपर्यंत त्यांचे घर बंद होते. या कालावधीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाची उचकापाचक करून आठ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले व सोन्याची नाणी चोरट्यांनी चोरून नेली. वेताळ सायंकाळी घरी आल्यानंतर घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यानंतर तोफखाना पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *