हिंगोलीत ट्रक – जीपच्या धडकेत सहा ठार

हिंगोलीत भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमींवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंगोलीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कलगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघातात झाला. भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृत व जखमी हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव व सुरवाडी येथील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *