गणेशभक्तांची सोय , गणपती स्पेशल ट्रेनना जादा डबे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने गणपती स्पेशल गाडयांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून सोडलेल्या चार गणपती स्पेशल गाडय़ांना प्रत्येकी तीन अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. ट्विटरद्वारे मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली.

कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची उसळणारी गर्दी पाहून मध्य आणि पश्चिम रेल्वेने यंदा कोकण मार्गावर दोनशेहून अधिक स्पेशल गाडय़ा सोडल्या आहेत. यामध्ये 11 आणि 18 सप्टेंबर 2018 रोजी सुटणारी ट्रेन क्र. 01095, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष गाडी, 12 आणि 19 सप्टेंबर 2018 रोजी सुटणारी परतीच्या प्रवासासाची ट्रेन क्र. 01096 सावंतवाडी रोड ते एलटीटी, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी सुटणारी ट्रेन क्र. 01103 एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष, 14 आणि 16 सप्टेंबर रोजी सुटणारी ट्रेन क्र. 01104 सावंतवाडी रोड ते एलटीटी या गाडय़ांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *