धक्कादायक, तरुणाचे महिलांच्या डब्ब्यात अश्लील चाळे

शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. महिलांच्या डब्ब्यात एकट्या असलेल्या एका महिलेसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केले. एका सतर्क प्रवाशाच्या हे लक्षात आल्यानंतर त्यानं आरडाओरडा केला.

यानंतर हा तरुण मस्जिद बंदर स्थानकात चालत्या लोकलमधून उतरून पळून गेला. या प्रवाशानं अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाचं मोबाईलमध्ये चित्रिकरण केलंय आणि घडलेल्या धक्कादायक प्रकारची रेल्वे पोलिसांकडे तक्रार ही केली आहे. आता फोटो आणि व्हीडिओच्या सहाय्याने रेल्वे पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *