दहीहंडीच्या बक्षीस वितरणादरम्यान स्टेज कोसळला

दहीहंडीचं बक्षिस वितरण सुरु असताना व्यासपीठ कोसळ्याची घटना पुण्यात घडली आहे. या दुर्घटनेत १५ ते २० जण जखमी झाले आहेत. बुधवार पेठेतील शिवाजी तरुण मंडळानं या दहीहंडीचं आयोजन केलं होतं. दहीहंडीचा उत्साह शिगेला पोचला असताना ही घटना घडली.

हंडी फोडलेल्या पथकाचे गोविंदा बक्षिस घेण्यासाठी व्यासपीठावर गेले आणि व्यासपीठ कोसळलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेतील जखमींना जवळच्या नाईक हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यात अनेकांना फ्रॅंक्चर असल्याचं कळतंय. व्यासपीठावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यानं हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *