वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू

पनवेल-मुब्रा मार्गावर तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतुल घागरे असं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पहाटे पाचच्या सुमारास तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक व्यवस्था पाहत असताना एका अज्ञात वाहनानं घागरे यांना धडक दिली आणि त्यातचं त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात व वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा भागात मोठ्या प्रमाणात कारखाने असल्यानं इथं जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. जड वाहनांमुळं वाहतूक कोंडी वाढत असून या भागात वाहतूक पोलिसांचं संख्याबळ वाढवण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र याची दखल न घेतल्यामुळंच घागरे यांना जीव गमवावा लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

घागरे यांच्या पत्नी रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दुर्देवं म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच घागरे यांना मृत्यूनं गाठल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *