जामखेड: इनोव्हा कारला अपघात; ८ जखमी

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या साईभक्तांच्या इनोव्हा गाडीला जामखेड नगर रोडवर अपघात झाला असून यात आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमींना तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही गाडी आंध्र प्रदेशातील हैदराबादहून येत असल्याची माहिती मिळते आहे. जामखेडहून दहा किमी अंतरावर असलेल्या पोखरी फाट्ययाजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढून जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून तीन जखमींची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *