महिला पॉवर वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या

रायगड जिल्ह्यातली महिला पॉवर वेटलिफ्टर वैभवी पाटेकरने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलं होतं. गोरेगाव इथे विष्णू तलावात पाटेकरचा मृतदेह आढळला. आर्थिक परिस्थितीला कंटाळून या युवतीने आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्रीपासून वैभवी बेपत्ता होती. अखेर गोरेगावच्या तलावात तिचा मृतदेह सापडला. वैभवीच्या आत्महत्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *