भांडुपच्या शाळेत विद्यार्थ्यांना डाळ खिचडीतून विषबाधा

मुंबईतल्या भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्देवी घटनेनंतर सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान विषबाधा झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात दाखल 

सकाळी मधल्या सुट्टीत या मुलांना डाळ खिचडी देण्यात आली होती. ती खाल्ल्यानंतर काही वेळानं त्यांना उलट्या व्हायला लागल्या. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना त्वरित मुलुंडमधल्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सोळा विद्यार्थी आणि एका शिक्षकावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *