वाकोल्यात झाड कोसळून ४ ठार, ५ जखमी

वाकोल्यात झाड कोसळून ४ ठार, ५ जखमी

वाकोला येथील पाइपलाइन परिसरात झाड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा मृत्यु झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.

सांताक्रूझमधील वाकोला परिसरात मध्यरात्री भिंतीच्यालगत असलेले एक झाड अचानक भिंतीवर कोसळल्याने यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यु झाला. तर ४ जण जखमी झाले. जखमीवर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. झाड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कोसळलेले झाड बाजुला केल्याची माहिती एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *