गूगल सर्चवर ‘मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर’च्या यादीत मोदी

गूगल सर्चवर ‘मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर’च्या यादीत मोदी

सर्च इंजिन गूगल तुम्हाला काय दाखवेल आणि काय नाही… याचा काही नेम नाही. सध्या या सर्च इंजिनवर भारतासाठी एक धक्कादायक गोष्ट दिसून येतेय.

गूगलमध्ये ‘मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर’ अर्थात ‘सगळ्यात मूर्ख पंतप्रधान’ सर्च केल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो दिसून येतोय.

गूगल इमेज सर्चमध्ये असं घडणं… ही काही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी ‘टॉप 10 क्रिमिनल्स’ असा सर्च केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसून येत होता. यानंतर गूगलवर जोरदार टीका झाली… सोबतच अल्गोरिदम बदलण्याचाही सल्ला गूगलला यावेळी मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *