मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
- नांदेड बंदला उस्फूर्त प्रतिसाद; अनेक ठिकाणी रास्ता रोको
- नाशिक- येवला तालुक्यातील पाटोदा येथे कडकडीत बंद
- पनवेलमध्ये सर्वत्र शांतता; रिक्षा, बसेस व ट्रेन सुरू, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- अलिबाग एसटी आगाराच्या बसेस बंद; प्रवाशांचे हाल
- नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग सकाळी ७ पासून बंदच; मराठा समाजाचा रास्ता रोको
- चाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत
- जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन
- जळगावात एसटी बस सेवा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा
- अहमदनगरमधील शेवगाव- गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे चौकाचौकात टायर पेटवले
- अहमदनगरमधील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प
- अहमदनगरमधील राहुरीचा आठवडे बाजार बंद, बस स्थानकावर शुकशुकाट
- दादरमधील भाजी आणि फूल मार्केट पूर्णपणे बंद
- सोलापूरात बाभळीची झाडं आणि टायर पेटवून चक्का जाम, मोटारसायकल रॅली काढून आंदोलनाला सुरुवात
- नागपुरातील सर्व खासगी शाळांना सुट्टी जाहीर
- मुंबईतील बहुतांश शाळा आज बंद
- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार
- हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं बंद
- ठाणे, नवी मुंबई, नाशिकमध्ये बंद नाही
- लातूर-बार्शी-पुणे महामार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी रस्ता रोखला